अलक क्र 2

अलक लेखन प्रकार
अलक. 2

तो गंभीर जख्मी झालेला. त्याची पत्नी स्वतः चे अश्रू सावरत लेकिला शांत करत होती. तितक्यात तिथे त्या दारूच्या नशेतल्या त्या युवकाला घेवून पोलिस आले व त्याच्या पत्नीला म्हणाले आम्ही याला घेऊन जातो. पोलिसांचे बोलणे ऐकून काही काळापूर्वी आलेल्या त्याच्या आईच्या डोळ्यांतील अश्रू आठवले, तस ती अपघातग्रस्ताची पत्नी म्हणाली नाही मला याच्यावर केस नोंदवायची नाही. त्याचे डोळे भरून आले व नशा चटकन उतरली त्याला त्याच्या हातून घडलेल्या कृत्याची परत आठवण झाली व त्यासरशी तो धायमोकलून रडू लागला.


©️®️ Prajakta Panari

🎭 Series Post

View all