Aug 09, 2022
प्रेम

अरे वेड्या मना.... भाग ३

Read Later
अरे वेड्या मना.... भाग ३

       आदित्य:-काळजी घ्या आई.....हा आहे तुमच्यासोबत......

अस म्हणून आदित्य निघून जातो.......

 

आता पुढे..........

 

 

आदित्य घरी जातो... त्यांच्या घराच्या बाजूला स्वत:ची बाग असते तिथे माळी काका असतात......आदित्य त्यांना विचारतो.....आदित्य त्या झाडांना हात लावून विचारतो...."कशी आहेत तुमची झाडं"...

 

माळी काका :- येता आहेत फळं... माळी काका हसून आदित्य ला सांगतात....

आदित्य :-Very good.....चला काळजी घ्या..आदित्य म्हणतो..आणि थोडा पुढे जाताच त्याच्या अंगठ्याला ठेच लागते..आणि आई गंsss....असं थोडा जोरात विव्हळतो...आणि त्याच्या अंगठ्यातून रक्त येत असते.. तो ते खाली वाकून एका पायावर बसून बघत असतो...आणि तो मान वर करून बघतो तर आदित्य ची आई त्याच्या समोर उभी असते..आदित्य हसतो...Good morning mom.....अंगठ्याची ठेच लपवत आदित्य     म्हणतो...

 

@@@@@@@@@@@@@

 

 

 

ईशा ऑफिसला पोहोचते....आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसते..आणि वर्तक सरांचा फोन येतो..ईशा म्हणते..Good morning sir..

 

वर्तक सर:- ईशा ती केळकर इंडस्ट्रीज ची फाईल रेडी आहे का???....सर ईशाला विचारतात....

 

 

 

 

 

 

 ईशा:- Good morning sir.... ती परत तेच म्हणते...

 

वर्तक सर:- माझी  माॅर्निंग काही गुड नाही कारण केळकर इंडस्ट्रीज चे बाॅस येणार आहेत....आणि त्यातAC बंद पडला... त्यांचेे आपल्याकडे करोडो  रुपये आहेत.. केळकर इंडस्ट्रीज ची  employees salary account ची फाईल रेडी आहे का???.....

ईशा :- हो सगळं तयार आहे .....

 

वर्तक सर:- त्यांना मोठा लाॅकर हवा होता.. त्याची सोय झाली का???...

ईशा:- हो... म्हणते...

वर्तक सर :- फाईल घेऊन तू माझ्याकडे ये...

आणि संभाषण झाल्यावर फोन कट होतो...

 

ईशा कॅबिन मध्ये जाते...

 

@@@@@@@@@@@@@@@@

 

 

इकडे आदित्य ची आई त्याला घेऊन घरात येते...आदित्य च्या अंगठ्याला किती लागलंय ते बघते...बिचारा आईचा जीव मुलाला लागलं म्हटल्यावर हळहळत असते...आणि अंगठ्याला हळद लावते....

 

आदित्य:- अगं आई मला काही एवढं झालं नाही..मी काही ट्रकला नाही धडकलो.... तो हसून बोलतो.....

 

 

निर्मला(आदित्यची आई):- असं अभद्र बोलू नको बाळा...आदित्यची आई काळजीने त्याला बोलते.....

 

आदित्य:-  अगं एवढं काही झालं नाही...तो हसत बोलतो...

निर्मला( आदित्यची आई ):- मी डाॅक्टरांना फोन करते...

आदित्य:- डाॅक्टरांनी हसतील आपल्यावर... तो हसत आईला सांगतो...

निर्मला (आदित्यचीआई ):-  म्हणून अशा केविलवाण्या अवस्थेत म्हणाला का तू ..आई गंsss ...माझ्या पोटात कालवलं रे...आज ऑफिसला जाऊ नको..आई आदित्य च्या काळजीपोटी बोलते..   

 

आदित्य :- अगं आई माझी महत्त्वाची मिटींग आहे...मार्टिन बरोबर न्यूयॉर्क वरून आला आहे तो..आणि त्याच्याबरोबर काॅन्ट्रक्ट व्हावं म्हणून मी ६ महिने मी झगडतोय... मी एवढी मोठी संधी नाही घालवू शकत...आदित्य आईला समजावत बोलत होता....

 

निर्मला (आदित्यची आई ):- ठीक आहे जा तू ....आई नाराजीने परवानगी देते......

आदित्य:- आई रागावू नकोस माझ्यावर.. तुझा माझ्यावर खूप जीव आहे..माहिती आहे मला...

 

निर्मला (आदित्यची आई ):- नाही रागावणार जा..आई हसत बोलते...

आदित्य :- आईच्या गालाचा चुंबन घेतो....

आणि ऑफिस ची तयारी करायला त्याच्या रुममध्ये जाणार तितक्यात आई हाक मारते..

निर्मला (आदित्यची आई ):- जाता जाता  बॅंकेत जाणार असशील तर स्लीप घेऊन जा...चेकबूक साठी मी कोणाला तरी कलेक्ट करायला पाठवून देईन...

 

आदित्य :- हो...म्हणून त्याच्या रूममध्ये जातो...

 

@@@@@@@@@@@@@@@@@

 

 

इकडे ईशा सरांना फाईल देते....

वर्तक सर :- You are perfect..&You  are best...आणि सर तिला केळकर सरांविषयी सांगतात..की त्यांना पैशांची मस्ती नाही..सर एकदम साधे..मुळात केळकर इंडस्ट्रीज ही त्यांच्या वडिलांनी उभी केली...पण आदित्य साहेब १४वर्षांचे असताना वडिल गेले...त्यानंतर आदित्य साहेबांच्या आईने पुढे बिझनेस वाढवला...वयाच्या १८व्या वर्षांपासून पुढे आदित्य साहेबांनी वाढवला..अशा माणसाची ओळख असणं ही अभिमानाची गोष्ट आहे...मी तुझी केळकर साहेबशी नक्की ओळख करून देईन ....सर ईशाला म्हणतात......... त्यांची ही फाईल तुला करायला दिली ना हा माझा परफेक्ट निर्णय आहे...वर्तक सर खूश होऊन ईशाला म्हणतात....

ईशा :- It's my pleasure...आणि ते माझं कामच आहे...ईशा सरांना म्हणते....

 

वर्तक सर:- केळकरांचे व्यवहार आपल्या बॅंकेतून होतात..अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे...आणि हो ACवाला  कधी येणार आहे??? ......सर ईशाला म्हणतात....केळकर साहेबांसमोर शोभा नको..

 

ईशा:- मी करू का फोन????....ती सरांना विचारते.....

वर्तक सर :- मी १५फोन केले..आणि मला सांगितलं की निघालो..निघालो ...असं सर  ईशाला सांगतात..

 

ईशा:- सर आपल्या कडून चांगलं बॅंकिंग मिळणं गरजेचं आहे का नाही.. AC बंद आहे म्हणून मला नाही वाटत त्यांना काही फरक पडेल...ईशा सरांना म्हणतेे......

 

 

 

 वर्तक सर:- ते बरोबर आहे पण आजच का???आजच का???

ईशा:- सर आज मला Half day हवाय..

वर्तक सर:- काय बघण्याचा कार्यक्रम आहे वाटत....

ईशा:- खाली मान घालुन लाजतच हो बोलते....

 

सरांना एक मोबाईल फोन येतो..ते बोलतच बाहेर जातात...आणि ईशा तिथून निघणार तेवढ्यात वर्तक सरांच्या कॅबिन मधला टेलिफोन वाजतो..आणि ईशा हसतच फोन उचलते..आणि फोन आदित्य ने केलेला असतो..फोन वरचा हसण्याचा आवाज ऐकल्यावर आदित्य पण हसतो ...

आदित्य :- Mr. वर्तक तुमच्या आवाजाला काय झालंय..

ईशा :-   sorry...I am sorry ..how can I help you....

 

आदित्य:- sorry ...माझा फोन connect तुमच्या कडे आलाय..तो वर्तकांकडे transfer कराल का??...

 

ईशा:- सर तुमचा फोन सरांकडेच आलाय..

आदित्य :- ओ.. ते आलेले नाहीत का अजून..???

 

ईशा :- ते आलेले आहेत ते एक ५मिनिटांत फोन attend करतील...नाहीतर तुमचा नंबर देऊन ठेवता का??..मी त्यांना आल्यावर करायला सांगते.....

 

आदित्य :- नाही...मला ते  actually salary account विषयी बोलायचं होतं.....But it's not that important.....

 

ईशा:- sir , every account holder is important to us.....तुमचं नाव  कळलं तर मी .....

 

आदित्य:-केस कोरडे करतच गालातच हसतो....तो सांगतो....as you rightly side...my name is account holder.....

ईशा:- गालातच हसते....

 

आदित्य:- हॅलो तुम्ही silent का झालात??...

ईशा :- sorry....I was smiling....

 

आदित्य :- you are silent because you are smiling...

ईशा:- हो... smiling & silence महत्त्वाचा असतो...कारण smile अडचणी दूर करते.. silenceअडचणींना दूर ठेवतं....

 

आदित्य:- Very impressive....thank you...

 

ईशा :- you are welcome..Mr..account holder...have a nice day..ती लगेच फोन ठेवतो....

 

आदित्य :- या आणि.....असे बोलतोच आणि तोपर्यंत फोन कट झालेला असतो.......

 

 

क्रमशः 

 

सदर कथा काल्पनिक असून कुठेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा........

 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो.......कमेंट करायला विसरू नका........

 

 

पुढचा भाग लवकरच पोस्ट केला जाईल.......

 

 

तोपर्यंत नमस्कार.........

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kajal