Aug 09, 2022
प्रेम

अरे वेड्या मना.... भाग २

Read Later
अरे वेड्या मना.... भाग २

ईशा:- आई गं मी असाच मुलगा बघून ज्याला मी माझ्या आई वडिलांची घेतलेली जबाबदारी घेतलेली चालणार आहे ......

 

सविता (ईशाची आई ):- हे काही खरं नाही ईशा कोणी असं करतं का????कोणत्या नवराला चालत नाही बायकोने आपल्या माहेरी पैसे दिलेले लव्ह मॅरेज करण्याची धमक नाही तुझ्यात........खाली मान घालुन ऑफिसला जाणार तशीच परत येणार..त्या आपल्या चाळीतल्या श्रेयस शी सूत जमवलं असतं ना तरी चाललं असतं.....

 

ईशा :- एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांशी बोलले म्हणजे त्यांच्यात काही असलंच पाहिजे का???..ती हसून बोलते......

ईशा:-आम्ही  अस एकमेकांबद्दल काही असलंच विचार करत नाही आणि करूही शकत नाही बरं स्मिता आणि त्याचं मीच जमवलं ना.....खरं सांगू त्यात मला आपल्या रोहितच दिसतो...... 

अस म्हणून ईशा रोहितला उठवायला जाते....

सविता( ईशाची आई ):-तू दुसरांची जुळवत  रहा तुझ्या गळ्यात कोण माळ घालणार....ईशाची आई वैतागून बोलते.......

 

ईशा :- रोहित उठ उठा..चला ६.३०झाले आता उठा....

रोहित :- झोपू दे ना ताई....

ईशा:-अरे ......

सविता (ईशाची आई ):- झोपू दे गं माझ्या सोन्याला रात्री जागरण झालंय त्याचं.....ईशाची आई ईशाला म्हणते.....

 

सुनिलराव (ईशाचे बाबा):- हो रात्री गुरं राखायला गेले होते ना ...... ईशाचे बाबा रोहितला तिरकसपणे बोलतात......

सविता( ईशाची आई ):- तुमच्या अशा बोलण्याने SY सुटत नाही त्याचं 

 

रोहित:- झोपू का थोडया वेळ डोकं दुखतंय माझं.... तो वैतागून म्हणतो.......

ईशा:-ए झोपू का काय क्लास आहे ना तुझा.......ईशा रोहितला सांगते........

 

रोहित :-असू दे......

 

ईशा :- SY च ४ वर्ष हे हे बघ उठ आपल्याला काही करुन या ऑक्टोबर मध्ये पास व्हायचं......उठ रे ह्या वेळेस जर SY पास झाला नाही तर 4G मोबाईल विसर....तसा रोहित ताडकन उठून बसला.......

 

रोहित:- उठलो...तु पण ना चहा दे आता........रोहित ईशाला वैतागून म्हणतो......

ईशा:-दात घास आधी....ईशा रोहितला म्हणते....

 

सुनिलराव (ईशाचे बाबा ):- बेड टी द्या त्यांना राजकुमार आहे ना ते.......ईशाचे बाबा चहा पोहे खात रोहितला तिरकसपणे बोलतात.......

 

रोहित :- सकाळी सकाळी बोर करुन नका....आळस देत रोहित बोलतो....

ईशा:-काय ठरलंय आपलं.. २अटी..आई बाबांना उलट उत्तर द्यायची नाही सरळ वागायचं.....ईशा रोहितला समजावत बोलत असते.......

रोहित :- मी नाही जात त्यांच्या वाट्याला....मी शिस्तीतच वागतो....ते लोक जातात माझ्या वाट्याला...... रोहित गादीवरून उठत म्हणाला..........

रोहित ब्रश टुथपेस्ट टाकणार तितक्यात आई म्हणते ब्रश धू तरी तो... आई रोहितला सांगते...तो ब्रश धूतो आणि इशाराने आईलाा धुऊन झाल्याचा दाखवतो.....आई उठत रोहित कडे जाणार तितक्यात ईशा तिथे येते म्हणते कुकरची ३शिट्ट्याझाला की गॅस बंद करशील का आई तेवढ्यात आईच्या पायात गोळा येतो म्हणून आई खाली बसते..... ईशाची आई ईशाला म्हणते.. पायात गोळा आला गं माझ्या.......

रोहित :-खोकतो.... मुद्दामहून खोकतो......

ईशा:-बरं बरं राहू दे मी बघते आणि स्वयंपाकाला लागते .....

 

 

 

 ईशा रोहितला हाक मारुन सांगते की तुझे चहा पोहे काढून ठेवले आहे..आलास की खाऊन घे आणि टाॅवेल सुकत टाकायला बाहेर जाते तेवढ्यात तिची आई तिला हाक मारुन सांगते की तु आज अर्धी दिवसाची सुट्टी टाक तुला पाहायला येणार आहे.......

ईशा :- हो आई माहिती आहे मला लक्षात आहे मला.......

सविता( ईशाची आई ):- तुझं तु जमवलं असतं ना तर आम्हाला असे जोडे झिजवायला लागले नसते.....तिथून ईशा हसून ऑफिसला निघून जाते........

 

सुनिलराव (ईशाचे बाबा ):- तिचं जुळलं नाही म्हणून किती बोलशील तिला...सरळ आहे माझी मुलगी... तिला चांगला नवरा मिळणार लक्षात ठेव कारण तिचं मन चांगलंं आहेे....ईशा बाबा रागानेे आईला बोलतात........

 

सविता( ईशाची आई ):- हो का चांगलं असून चालत नाही हया जगात बेडकासारखा वागावे लागते...ईशाची बाबांना म्हणते.....

 

सुनिलराव (ईशाचे बाबा ):- तिला साजेसा असा नवरा येऊन तिच्या गळ्यात माळ घालेल तिच्या बघ तू.....

सविता (ईशाची आई ):- तिच्या गळ्यात माळ,आमच्या गळ्याला फास 

सुनिलराव (ईशाचे बाबा ):- काय म्हणालीस?????.....

सविता (ईशाची आई ):- कोण लिहिलंय हिच्या नशिबात कोण जाणे......

 

आदित्य केळकर २७वर्षांचा तरूण....गोरा, उंच, देखणा, रुबाबदार, हुशार...... पण कामाच्या बाबतीत एकदम परफेक्ट....आणि वेेेळेलाही....केळकर इंडस्ट्रीज चा मालक......

 

आदित्य जाॅगिंग करत असतो आणि त्याला रस्त्याने एक बाई दिसतात....त्यांचा मुलगारस्ता क्रॉस करून त्याच्या कडे यायला सांगतो ....पण त्या बाईंना रस्ता क्रॉस करायला जमत नाही.....आदित्य हे सगळं बघतो....तो  मुलगा म्हणतो...अगं आई ये लवकर नाही येत गाडया..घाबरायचं काय आहे त्यात....आदित्य त्या  बाईंच्या  मदतीला जातो.. आणि रस्ता क्रॉस करून त्यांच्या मुलाकडे आणतो.. आणि तो मुुलगा आईला म्हणतो अगं आई तुला साधा रस्ता क्रॉस करता येत नाही गं....आदित्य म्हणतो अरे  मित्रा असं वागू नये रे आई तुझी ती....आयुष्यात सगळं काही परत मिळू शकते पण आई नाही ....  हे मी तुला सांगूशकतो कारण एखाद्याला आईच जितकं प्रेम मिळत त्याहीपेक्षा कदाचित २पटीने जास्त प्रेम मला मिळालं.. काळजी   घेे आईची..असं आदित्य त्या मुलाला म्हणतो...

 

आदित्य:-काळजी घ्या आई...हा आहे तुमच्यासोबत.... आदित्य त्या बाईंना म्हणतो...आणि त्या बाईंच्या पाया पडतो आणि तिथून निघून जातो.....

 

क्रमशः 

 

 

ईशाला बघायला येणारा मुलगा कोण असेल????बघुया पुढील भागात......

 

 

 

सदर कथा काल्पनिक आहेत कुठेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.......

 

 

 

 

 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो.... कमेंट करायला विसरू नका.......

 

 

 

पुढचा भाग लवकरच पोस्ट केला जाईल....

 

 

 

तोपर्यंत नमस्कार........

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kajal