Jan 23, 2021
माहितीपूर्ण

जरा माझ्या बद्दल

Read Later
जरा माझ्या बद्दल

आज  ईरा शी जुडले बऱयाच दिवसा पासन ब्लॉग वाचायचे ,वाचनाची आवडत ही आधी पासन ,शाळेतल्या दिवसा पासन लिहायचे कविता आणि रोजनिशी , काय माहीत पण  आवडायचं मन हलक झाल्यासारख वाटायचं ,वय तस लहान होत पण विचार खूप करायचे अभ्यासात लक्ष  कमी आणि आपल्यातच जास्ती राहायचे ...लिहणं फार आवडायचं पण कधी लेखक बिखक होऊ असं वाटलं नाही आज ही वाटत नाही पण मनातलं कागदावर उतरवण्यात जी गंमत आहे ते दुसऱ्या कशात नाही .....कॉलेज ,शिक्षण यात स्वतःला मात्र विसरले लिहण्याकडे बरंच दूर लक्ष झालं वाचन मात्र होत .बराच काल जीवनाचे चढउतार बघण्यात गेले ,स्वतः साठी वेळ काढता मात्र आला नाही ,,,बऱयाच गोष्टी जीवनात घडत गेल्या बरंच शिकत गेले स्वतःला हारून बसले त्या दिवसात ना छंद झोपसले ना स्वतःचा विचार केला बरंच एकटं वाटायचं स्वतःच अस्तित्व हारून बसले ,,आता जरा निवांत झाले वाटलं स्वतः साठी जगुयात झाड लावणे ,डान्सस ,वाचन यात रमायचं ठरवलं .....काही वेळ एकांतात घालवला ....अन स्वतः वर जास्ती प्रेम करायला लागले आणि  हे खूप म्यजिकल होत मी स्वतःला गवसलं ,मला कळायला लागलं माझा आनंद कशात आहे ...मी आनंदी राहायला लागले ...खूप बोलायचं होत ....बरंच सांगायचं आहे .स्वतःला आनंदी ठेऊन दुसर्यां ना आनंदी करायच आहे ...लिहिण्याच्या मार्गे स्वतःला व्यक्त करायचं आहे माझे अनुभव तुमच्या शी वाटायचे आहे ...जीवनात खुश राहणं खूप महत्वाचं आहे ..आपण खुश असू तर दुसर्यां ना खुश ठेऊ ...आज पासन माझ्या या ईरा च्या सफरीला सुरुवात होत आहे ,मला तुमच्याशी जुडून अनुभव सांगायला ,विचारांची आदान प्रधान करायला खूप आवडेल तुम्हला आवडेल काय ....कंमेंट करून नक्की कळवा ....तुमची वाट बघत आहे ,,,मला नाही वाटत या पेक्षा चांगला माझा पहिला इंट्रोड्युक्टिव असू शकतो 

 

Circle Image

Ganga Mesharam

No

I m intrested in dancing ,writing,reading