Dec 01, 2021
प्रेम

अधिरा , एक भन्नाट प्रेम कथा 16

Read Later
अधिरा , एक भन्नाट प्रेम कथा 16

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

अधिरा , एक भन्नाट अशी प्रेम कथा 15

श्री लंडनला निघून गेला ...... तिथे सगळं नीट अरेंज करून आपलं रोजच रुटीन चालू केलं........तस त्याला लंडन काही नवीन नव्हतं च .... त्याची स्वतःची अशी मस्त थोडं शहरा बाहेर जागा होती, त्यात छोटासा बंगलो विथ छोटस गार्डन होत आणि आजू बाजूचे हि तसे ओळखीचे होते त्यामुळे श्री ला तिथे जास्त आवडत होत.... आणि तो पुन्हा निघूनही आला भारतातून .....  सकाळी उठून जिम, ऑफिस जाणं, संध्यकाळी थोडा फ्रेंड्स बरोबर चिल्ल करण मग घरी जाऊन जेवण वगरै वगरै चालू होत........पण त्याच ध्येय त्याला पूर्ण करायचं आहे हे त्याच्या पूर्ण पणे डोक्यात होत .... आणि तेच तो करत हि होता ....   इथे अधिरा पण तिच्या रोजच्या रुटीन कॉलेज आणि  क्लासेस मध्ये बिझी झाली...... असच पूर्ण ८ महिने झाले ....   त्या दरम्यान सिद्धार्थ ने अधिरा शी ओळख वाढली .... ... तुम्ही विचारलं कशी ....  सीड ( उर्फ - सिद्धार्थ ) एक बिझनेस मॅन पण त्याचे वडील अर्थात अधिरा च्या कॉलेज चे डीन आहेत ... तर काय ... सीड साहेब ने अधिराला कॉलेज मध्ये पहिल्यांदाच बघितलं ते पण मस्ती करताना ..... तिचा खोडकर स्वभाव ... गहिरे डोळे ... नाजूक होठ....वयात आलेली तिची सुंदर काया ....त्यात तिला साथ देणारा तिचा कमनीय बांधा ........ तिला बघताच हि माझी आहे असं त्याच्या मानाने त्याला दिलेला कौल .. त्याला तिच्या बद्दल असलेलं अट्रॅक्शन ...... तेव्हा पासून साहेब वेळ मिळेल तेव्हा काही कारण काढून कॉलेज मध्ये जातात आणि त्यात सोने पे सुहागा पार्टीत झालेली स्पेसिअल ओळख ... दोघे फ्रेंड्स तर बनले ...मग काय विचारू नका .......... सिडला कारण शोधायची पण गरज नाही लागली भेटली कि बोलणं होत राहायची .... असच एके दिवस अधिराची स्कुटी रस्त्यात खराब झाली....... सीड कॉलेज मधून वडिलांना घेऊन घरी जात होता आणि त्याच लक्ष अधिरावर जात ........  ती उन्हात नाव्हून लाल झाली होती .. स्वतःवरच  चिडत होती ... तेवढ्यात सीड आपल्या ड्रायव्हरला गाडी बाजूला थांबवायला सांगतो ..... 

सीड : हेय ... अधिरा ... व्हाट्स हॅपन.....

अधिरा : सीड ... हाय .... माझी स्कुटी बंद पडली ... आणि इथे जवळ कोणी मॅकेनिक पण नाही दिसत आहे ... आणि आज टिकू पण नाही आहे ... सो आता विचारच करत होती कोणाला कॉल करू ते ..... पण तू का थाबलास इथे ... 

सीड : कॉमन अधिरा .... ऑफकोर्स तुझ्या साठी .... तिला आणि वडिलांना चुकीचं वाटू नये म्हणून मीन्स फ्रेंड आहेस तू मग मदत नको का करायला फ्रेडची ... काय .....

अधिरा : ओ ओ ..... थँक्स .... माय फ्रेंड..... पण मग आता काय दोघे इथेच गप्पा मारायच्या का ... काय करू मी .. मदत करणार आहेस ना ..... कर काहीतरी मग ..... 

सीड : जो फक्त तिला बघण्यात मग्न असतो ... तो भानावर येत .. अरे हो ... चिल्ल.... माझी गाडी मागवली आहे मी .. येईल ती....मग मी सोडतो तुला घरी आणि ड्राइवर तुझी स्कुटी घेऊन जाईल आणि घरी आणून पण देईल .... कळलं ... 

अधिरा : अरे पण तुझी गाडी तर बाजूलाच आहे ना .. मग दुसरी कशाला ..... 

सीड : ओ ... शिट्ट ... त्याच्या आता कुठे लक्षात येत कि आपण बाबाना गाडीत बसून बाहेर मस्त अधिरा बरोबर गप्पा मारत आहोत .... अधिरा वेट हा मी लगेच येतो ऍक्च्युली बाबा आहेत गाडीत त्या .. त्यांना पुढे जायला सांगतो ओके ... वेट फॉर २ मिन्ट्स बेबी .... 

अधिरा : अच्छा.... जा ... 

सीड : अधिरा ला थांबून गाडीत येतो आणि बाबाना ती माझी फ्रेंड आहे तिला सोडून येतो घरी म्हणून  बाबाची गाडी पुढे पटवून देतो ... तोपर्यंत ड्राइवर त्यांची दुसरी गाडी पण घेऊन येतो ....ड्राइवर ला अधिराची स्कुटी ठीक करून तिने पत्त्या वर सोडायला सांगतो आणि स्वतः गाडी ड्राईव्ह करून अधिराला सोडायला जातो ..  चल अधिरा ये गाडीत बस्स करत तिला डोर ओपन करून बसवतो आणि खुश होऊन ड्राईव्ह करतो ... अधिरा पण गाडीत बसते तेव्हा कुठे तिला बर वाटत उन्हाने लाल झालेली आता शांत AC  मध्ये  थंड हवा घेत, डोळे बंद करून रेलून बसते आणि सीड तिला मध्ये मध्ये डोळ्याच्या कोपऱ्याने बघत गाडी चालवत असतो ......   अधिरा थोडं पाणी पण घे म्हणजे थोडं बर वाटेल .. मागेच ठेवली आहे बॉटल मी दिली असती पण ड्राईव्ह करतो ना .. तेवढी घे आधी .... 

अधिरा : सीड अस बोलताच बॉटल घेऊन गटागटा पाणी पिते ...  जीवाला थोडी शांती मिळाल्या नंतर .... ओ सीड थँक यू खरंच तू आला नसता तर आज माझे वांदेच झाले असते ..... यार तू खरंच जिगरी यार आहेस माझा ..... एवढ्या उन्हातून तू मस्त सावलीत मला सोडतोस घरी ... १ नंबर ..... किती बर वाटलं आता तुला काय सांगू ... सुख रे सुख ... आनंद ... उन्हातून थंड हवेची सावली मिळणे म्हणजे जगातलं महागडं सुख ...  खरंच थँक यू ....

सीड : इट्स माय प्लेजर ... डिअर अधिरा .... पण तुला सांगू खरंच एवढी नौटंकी करायची गरज नाही ... मला कळत तेवढं.... तू फ्रेंड्स आहे माझी आणि तुला बघितलं म्हणून थांबलो नाहीतर  माहिती आहे ..... 

अधिरा : ह्म्म्म ... ते ठीक आहे पण तू इथे मीन्स कॉलेज मध्ये काय करतोस .... पार्टीच्या नंतर मी तुला सारखा बघितलं आहे कॉलेज मध्ये ... म्हणजे वाईट नको वाटून घेऊस पण एखादा सबजेक्ट वगरे उडाला काय तुझा .... 

सीड : तिच्या ह्या बोलण्यावर तोही गोंधळाचं पण शेवटचं वाक्य एकूण त्याच हसूच कंट्रोल होत नव्हतं .... आर यू सिरियस अधिरा ..... ओ माय गॉड...... तू खरंच असा विचार करतेस कि फक्त मस्करी करतेस ......

अधिरा : नाटकी रागात सीड कडे बघत ... आधी तू सांग .... का येतोस कॉलेज मध्ये ... 

सिड : अरे हो हो ! सांगतो .... मॅडम तुमच्या कॉलेज चे डीन माझे डॅड आहेत ......... सो त्यांच्या बरोबर कधी कधी येता जात टाइम स्पेंड करतो ..... काही काम असतात सो मग मी येतो असाच .....

अधिरा : अधिराचे डोळे आपोआप हे एकूण मोठे होतात .... आणि आश्चर्याने डोकं स्तब्ध .... मोठ्याने त्याला परत तेच विचारते काय ....... तू खरंच सांगतोस कि खोटं ......

सिड : तिला एवढ्या आश्चर्याने गोंधळले बघून ... त्याला पुन्हा हसायला येत, तिची समजूंत घालतो ... हो मॅडम मी खरं बोलतो हवं तर तू त्यांच्या केबिन  मध्ये जाऊन बघू शकतेस टेबल वर माझा फोटो आहे आधी पासूनच ...... 

अधिरा : व्वाव यार ................. मस्त ......... आणि बर झालं तू माझा फ्रेंड आहेस म्हणजे मला अजून मस्ती करता येईल .... काय .... आपल्याच नादात बोलून जाते ......

सिड : काय बोललीस ...... मस्ती ...हम्म्म्म .... पण तू खरंच खूप मस्ती खोर आहेस ........

अधिरा : बारीक डोळे करून त्याला बघत असते ......तुला काय माहित .. तू असं जजमेंट कस पास करू शकतो माझ्याबद्दल ...... 

सिड : हो नक्कीच करू शकतो .... कारण ..... 

अधिरा :  काय ....

सिड : कारण मला माहिती आहे ... पार्टीत श्री ची प्लेट तू बददलीस आणि ती पावडर पण टाकलीस रुमाल मध्ये .....ज्या मुळे त्याला शिंका येत होत्या ... बस्स नंतर तू अजून काही केलं अशील पण मला मिटिंग होती म्हणून जावं लागलं .......

अधिरा : येइइइइ..... हॅलो ..... मी नाही ते टिकू ने केलं होत ..... आणि तू काय वॉच ठेवतो काय .... मी काय करते ते .... 

सिड : हो ! ...... 

अधिरा : काय ......

सिड : गाडी चालवणे आणि बोलण्याच्या नादात सिड बोलून तर गेला पण आता लगेच काय सांगणार तिला ... आपल्या मनातली गोष्ट कशी सांगू .....आताशी कुठे मैत्री केली आहे तिला हे कळलं तर ... ह्या विचाराने तो गडबडून जातो ... म्हणजे मला तस नव्हतं बोलायचं .. लिसन टू मी अधिरा ...... मी तिकडे कॉल वर बोलत होतो आणि तुम्ही दोघे तु आणि तुझा फ्रेड हा प्लॅन बनवत होता ते एकल मी ... बस्स्स .... मनातच हुश्श ...............म्हणत त्याने एकदाच सांगून टाकलं ..... 

अधिरा : इट्स ओके .... पण हे श्री ला सांगू नको आता ... मला माहित आहे तुम्ही एकत्र काम करता ते. ...

सिड : हि नौ ऑल व्हेरी वेल .... 

अधिरा : मे बी .... बोलता बोलता अधिरच घर येत ... सिड तिला सोडतो पण ती त्याला घरी येण्याचा आग्रह करते.. 
चल ना सिड मॉम  खरंच खूप छान जेवण बनवते अट लिस्ट  घरी तरी चल .... 

सिड : मनातच खुश होत, व्हा! आता घरी पण आलो म्हणजे अर्ध काम झालं ... ओके बेबी चल.....

अधिरा : आई ..... हाक मारतच घरात शिरते ... हे बघ कोण आले आहेत Mr . सिद्धार्थ ...

मधू : किचन मधून बाहेर येत ...... काय हि पोरगी ... केव्हढ्यानी ओरडतेस आधु .... हळू जरा ..... तिच्या मागूनच सिद्धार्थला येताना बघून ... अरे सिद्धार्थ ये ये .... आज इथे कशी काय वाट चुकली तुझी ... आणि कसा आहेस ... काम काज कस चालू आहे .....

सिड : काकी आहो ....काही नाही ओ, अधिराची स्कुटी बंद पडली म्हणून सोडायला बस्स बाकी काही नाही .... तुम्ही कश्या आहात... माझं सगळं मस्त चालू आहे .....

अश्याच गप्पान मध्ये दिवस जात होते आणि सिड च अधिराच्या मैत्री हि दिवसेन दिवस  घरी जाणे येते वाढले ... त्यांची मैत्रीही चांगली खुलून आली होती ....असेच ३ वर्ष निघून  जातात .....

अधिरा : अग ममुडी ... तो माझा पण फ्रेंड आहे सांगितलं होत ना तुला लास्ट टाइम तेव्हा पासून फ्रेंड्स आहोत .. आज माझी गाडी बंद पडली म्हणून आला सोडायला सो मी त्याला आत बोलावलं ... तस तु हि ओळखतेस त्याला .... 

असाच गप्पा आणि गोष्टी चा सिलसिला चालत राहिला .....सिड  आणि अधिराची मैत्री अशी वाढतच चालली होती .... असेच ३ वर्ष पूर्ण झाली ... अधिराच शिक्षण हि आता पूर्ण झाले..............

मित्रानो तुम्हाला सगळ्यात आधी सॉरी कारण मी पार्ट लेट टाकला घरात काही प्रॉब्लेम्स मुळे स्टोरी लिहता आली नाही  ......... आणि आता पुढे काय होत ते बघूया पुढल्या भागात .... वाचत राहा अधिरा.... तुम्हा सर्वांचे खूप आभार कंमेंट्स केल्या बद्दल. 
 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mukta Swapnil

Accountant

शब्दांना किंमत आणि मनातल्या भावना, प्रेम करणाऱ्याला कळत नसेल तर त्या प्रेमाला अर्थ नाही.......