Login

आनंदाचे डोही आनंद तरंग चा अर्थ मराठी meaning in marathi >>

आनंदाचे डोही आनंद तरंग चा अर्थ मराठी meaning in marathi >>
आनंदाचे डोही आनंद तरंग चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग

मराठी अभंगाचा अर्थ.

आनंदाचे डोही आनंद तरंग हा संत तुकारामांचा अभंग . या अभंगाला ते पूर्णत्वाचा अभंग म्हणतात जेव्हा व्यक्तीला सर्व काही मिळाले आहे सगळीकडे आनंदसानंद आहे तेव्हाचा हा अभंग.
संतांचे अभंग असो किंवा कवींच्या कविता प्रत्येकाला त्याचा एक वेगळा अर्थ कळतो मी माझ्या वतीने मला कळलेला भावार्थ इथे मांडत आहे सुरुवातीला पाहूया अभंगाचे बोल आणि नंतर याचा अर्थ.

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥१॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

अर्थ.
This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

हा तुकारामांच्या पूर्णत्वाचा अभंगापैकी एक अभंग इथे संत तुकारामांनी अशी एक स्थिती गाठली आहे जिथे चहूबाजूंनी आनंदाचं आनंद आहे.
भोगायचे राहिलेले असे एकही दुःख येथे नाही तिकडे पहावे तिकडे आनंद आहे सगळ्या अंतरंग आनंदी आहे
अति हर्षाने ते म्हणतात काय सांगू मला कळत नाही आहे हा आनंद इतका अपरंपार झाला आहे..


दुसऱ्या ओळीमध्ये संत तुकाराम म्हणतात मातेच्या गर्भात असताना आपण मातेच्या किती जवळ असतो .
आधी तितकाच जवळ भगवंताच्या भक्तीने गेलो आहे आणि ही भावना प्रकट करण्याच्या ही पलीकडे गेली आहे इतके चांगले वाटत आहे म्हणजे या भावनेला नावही नाही अशा अर्थाने काहीच्या बाही शब्द वापरला आहे.
ते म्हणतात जर बाळाला काही खावेसे वाटले तर तू सांगू शकत नाही बोलू शकत नाही कुणाकडे काही मागू शकत नाही पण तीच भावना मग आई मध्ये येते आणि आई सांगते की काय खावेसे वाटत आहे ती इच्छा मूळतः त्या बाळाची असते जी आई प्रकट करते असेच काही संत आणि सद्गुरू च्या बाबतीत होते.


शेवटी तुकोबा म्हणतात हा आनंद मला अनुभवता येत आहे याचेही कारण भगवंतच आहे कारण ही भावना इतर कोणी मला देऊ शकलं नसतं हे शब्द जे आत आहेत जे बाहेर आहे ते सुद्धा परमेश्वराने आदी ईश्वराने मला दिलेले आहेत.

एखाद्या व्यक्तीला खूप सारे वर्ष तप केल्यानंतर अथक प्रयत्नानंतर जे सुख मिळावे ते सुख मिळाल्याचे समाधान तुकारामांच्या अभंगातून आपल्याला दिसते इथे पूर्णत्व आहे कशाचीही कमतरता नाही.
आणि हा पूर्ण आनंदी वृत्तीने हर्षाने लिहिलेला अभंग आहे ज्यामध्ये संत तुकाराम आनंदाची एक वेगळीच परिभाषा सांगतात.


1. Synonyms of  आनंदाचे डोही आनंद तरंग
2. Definition of   आनंदाचे डोही आनंद तरंग
3. Translation of आनंदाचे डोही आनंद तरंग
4. Meaning of  आनंदाचे डोही आनंद तरंग
5. Translation of   आनंदाचे डोही आनंद तरंग
6. Opposite words of   आनंदाचे डोही आनंद तरंग
7. English to marathi of   आनंदाचे डोही आनंद तरंग
8. Marathi to english of   आनंदाचे डोही आनंद तरंग
9. Antonym of  आनंदाचे डोही आनंद तरंग


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


0