एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-19

Story of a young wandering girl in search of her destiny. Thank you

भाग 18 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचा

http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-18_6235

एक उनाड वाट भाग 19

सिडनी शहरातील लुना पार्कमधे शूटिंगसाठी सिनेमाची टिम सज्ज झाली. लुना थीम पार्क मधील जोकर असलेला गेट, मोठ मोठे आकाश झुले, रंग संगतीचा विचार करून केलेलं डेकोरेशन आणि सिडनीचं विस च्या खाली असलेलं तापमान. सगळंच एकदम भारी रोमँटिक. ओम आणि मिनूचा तर अवतारच बदलला. शॉर्ट ब्लॅक वनपीस घातलेली मिनू आणि काऊ बॉय हॅट घातलेला ओम तिला ओळखूच आला नाही. त्यांना परत भेटून इंदिराला खूप आनंद झाला. अनुभवनेही त्यांना हाय हॅल्लो केलं. ते गप्पाच मारत होते.

कि अनुभवला बघताच विस एकवीस वर्षाची, नितळ गोऱ्या कांतीची, ऑरेंज कलरचा, वन शोल्डर जम्प सूट घातलेली मायरा धावतच त्याच्याजवळ आली. त्याला आलिंगन देऊन म्हणाली,
"ओह डियर अनि कसा आहेस तु? किती दिवसांनी भेटतोय आपण. आमच्या सोबतच यायचं होतं. मस्त मज्जा केली असती ना."
मायराला असं अनुभवला चिपकतांना पाहुन इंदिराला तिचं डोकं फोडायची इच्छा झाली. त्यात अनि, अनि म्हणजे काय. इतकं चांगलं नाव आहे अनुभव किंवा अनु म्हण. तिची स्वतःशीच बडबड सुरु झाली. पण अनुभवचं इंदिरावर पूर्ण लक्ष होतं. तो तिला म्हणाला,
"काही बोललीस का तु?"
"नाही. काहीच नाही. ही जागा, हा पार्क खूप छान आहे."
"हो."
"ओह डियर अनि बेटा, हे कोणाला उचलून आणलंस तु?" पोपटी रंगाचा शर्ट आणि राखंडी रंगाचा ट्राऊजर घातलेल्या, अर्धे केस क्लचमधे घेऊन बाकी केस खांद्यापासून खाली मोकळे सोडलेल्या, अजिबात मेकअप न केलेल्या इंदिराला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत मायराच्या सिल्वर मेटॅलिक लिपस्टिक, रेड लॉंग स्लीव्हलेस ड्रेस आणि फॅशनेबल ब्ल्यू गॉगल लावलेल्या आईने अनुभवला विचारलं.
"माझी पर्सनल असिस्टंट आहे, इंदिरा."
"तूझ्यासारख्या सुपरस्टारची असिस्टंट इतकी आउट डेटेड."
"मायरा मला माझ्या एम्प्लॉयीला कोणी काही म्हटलेलं आवडत नाही." अनुभव मायराच्या आईला काहीच न म्हणता  मायरालाच बोलला.
"ओह, पण इतकं एम्प्लॉयीला डोक्यावर चढवणं बरं नाही."
"मॉम चल इथून, मला शूटिंगसाठी रेडी व्हायचं आहे." मायरा आईला घेऊन व्हॅनिटीत गेली.
"आय लव्ह यु माय सुपरस्टार." इंदिरा मनातल्या मनात म्हणाली. पण मायरा आणि तिच्या नाटकी आईला पाहुन तिला चिंताही वाटली, सिनेमा पूर्ण होणार कि नाही. अजून पन्नास टक्केही सिनेमा पूर्ण झाला नव्हता यांच्या नाटकांपायी.
"इंदिरा." अनुभवनी तिला आवाज दिला, "तु जरा विचार विश्वातून बाहेर ये आणि ऍक्शन कर."
"म्हणजे."
"ही मिस्टर माथूरनी स्क्रिप्ट पाठवली आहे." अनुभव तिच्या हातात आयपॅड देत म्हणाला, "वाचून काढ. रात्री झोपायच्या आधी मला समजावून सांगशील शॉर्टमधे स्टोरी."
"ओके, मी वाचते."
अनुभवला पुढच्या सीनसाठी डायरेक्टरने बोलावलं.

तिकडे त्यांचं शूटिंग सुरु झालं, इकडे अनुभवच्या व्हॅनिटीत  बसून इंदिरा आय पॅडवर स्क्रिप्ट वाचू लागली. एक रनर मुलगा तिला शोधत होता. त्याच्या हातात काहीतरी पार्सल होतं.
"अनुभव सिन्हाची व्हॅनिटी कोणती आहे?" त्यानं एका स्पॉट बॉयला विचारलं. अनुभवचं नाव ऐकताच मायराच्या आईचे कान टरकावले.
"ती किंगफिशरचं चित्र आहे ना. ति आहे. का बरं विचारतोय? आणि हे हातात काय आहे?" स्पॉट बॉयनं विचारलं.
"फूड पार्सल आहे. अनुभवनी त्याच्या असिस्टंटला द्यायला सांगितलं."
(अनुभव त्याच्या कामात असला कि त्याला कशाचंच भान राहत नसे. मग तो फक्त त्याच्या अभिनयाचा. दिवसभर शूटिंग चालणार अशात इंदिराकडेही त्याचं लक्ष देणं होणार नाही. म्हणून त्यानं आधीच तिच्यासाठी फळं, ज्यूस, चीज पास्ता आणि रॅप असलेलं पार्सल पाठवलं. )

"असिस्टंट नाही भावा गर्लफ्रेंड म्हण गर्लफ्रेंड !"
"हो मलाही वाटतं यांना पाहुन कि यांच्यात काही केमिस्ट्री आहे."
"काही नाही रे, पूर्णच केमिस्ट्री आहे. काही दिवसांपूर्वी  अनुभवचा हात धरून मॉल मधून धावत बाहेर निघतांनाचा एका मुलीचा व्हिडीओ वायरल झाला होता ना, ती मुलगी ही मॅडम इंदिराच आहे बघ."
"हा... दाखव बरं."
"अरे मीडिया परेशान करेल म्हणून अनुभव सिन्हानी सायबर  क्राईममधे ओळखीच्या लोकांना सांगून डिलीट करायला लावला तो व्हिडीओ."
"हम्म! जाऊदे सहा सात वर्ष झाली अनुभव सिन्हाला हिट होऊन अशा किती आल्या अन किती गेल्या."
"नाही, यावेळेस मॅटर लग्नापर्यंत जाणार असं गुप्त सुत्रांकडून ऐकलं आपण. त्याच्या आजीलाही इंदिरा आवडली आहे."
"चांगलं आहे मग, इंदिरा मॅडम छान आहे तशी. ताठपणा नाही तिच्यात बाकीच्यांसारखा."
"हा खाऊ मग मिठाई लवकरच." तो हसतच म्हणाला, "मोठया लोकांच्या मोठ्या गोष्टी. चल जा बाबा पोचतं कर पार्सल."

दोघं आपापल्या रस्त्याला लागले. मायराची आई जळून खाक झाली. एक फालतू, रस्त्यावरची मुलगी, ना अक्कल ना शकल बॉलिवूडवर अजून विस तिस वर्ष तरी वर्चस्व ठेवणार अशा मोस्ट एलिजिबल बॅचलर सुपरस्टार अनुभवची बायको होईल. अशक्य ! त्याचं लग्न तर मायरा सोबतच होईल. म्हणून तर मी ह्यांच्या पाठीशी लागून लागून मायराला अनुभवच्या हिरोईनचा रोल मिळवून द्यायला सांगितलं. त्या इंदिराला तिची जागा दाखवावीच लागेल.

हिरो आणि हिरोईनच्या फिल्म मधील रोमँटिक सीनचे  चित्रीकरण आकाश झुल्यावर सुरु झालं. पण मायरा कधी डायलॉग विसरे तर कधी तिला ओल्या कपड्यांनी थंडी भरून येइ, तर कधी आकाश झुल्यातून खाली बघितलं म्हणून तिला चक्कर येइ, तर कधी प्लेन चेहरा ठेऊनच ती पटपट रट्टा मारल्यागत सर्व डायलॉग बोलून जाई. ज्यामुळे अनुभवचा फ्लो गेला आणि तोही बिचकून गेला. एका ब्रेक नंतर परत सीन चित्रित करू असं बोलून तो चेयरवर बसला.

"सिनेमाचं नाव, प्यार एक एहसास" डायरेक्टर कोहली  संतप्त होऊन त्याला  म्हणाला, "अन मेन लीडमधे प्यार तर सोडा एहसासही दिसत नाही. रिटेकवर रिटेक होताहेत. पण मायरा तर जाऊदे अनुभव तु, तु सुद्धा नीट इमोशन देत नाही आहेस. तु तर या इंडस्ट्रीत चांगला मुरला आहेस या सहा सात वर्षात  तु केलेल्या सात सिनेम्यांपैकी चार सुपरहिट आणि तिन हिट झाले आहेत. तरीही असा करतोय तु! I am fed up now."

"मायरा चेहऱ्यावर हाव भावच असे आणते कि माझे सर्व इमोशन गायब होतात. तिच्यात ठासून ठासून बालिशपणा भरला आहे. तुम्ही काय विचार करून तिला हिरोईनच्या रोल साठी घेतलं? इतक्या मोठया बजेटचा सिनेमा. पंचवीस टक्के शूटिंग ऑस्ट्रेलियात ठेवलेली. त्यात नवीन चेहरा घ्यायचा होता तर आपण आणखी ऑडिशन घेतले असते. पण तुम्ही मायराला ऑडिशन न घेताच फायनल केलं. अमेझिंग आणि आता मला म्हणता कि मी इमोशन नाही दाखवत."

"मायरा माझ्या एका NRI बिजनेसमन मित्राची मुलगी आहे. त्यानं माझ्या तीन मुव्हीत पैसा लावला होता. या फिल्मचाही 25% खर्च तोच उचलणार आहे. तो मुलीला ब्रेक दे म्हणाला आणि मी नाही म्हणू नाही शकलो. मला वाटलं इतका मागे लागतोय म्हणजे तिला थोडीफार तरी ऍक्टिंग जमत असेल. पण तिला तर डायलॉग पास करणंही जमत नाहीये त्यात तिची आई सतत तिच्या भोवती भवऱ्यासारखी फिरत असते त्यामुळे तिला जाऊन समजावणंही अवघड झालं आहे."

"मी शर्यत लावून सांगतो ही मुव्ही फ्लॉप होणार आहे जर मायराला रिप्लेस केलं नाही."

"मला थोडा वेळ दे. मी विचार करून बोलतो तुझ्याशी. इतक्या लवकर कोणाला घेणार आपण आणि नवीन मुलगी घ्यायचं म्हटलं तर ऑडिशन वगैरेत खूप वेळ जाणार." इतकं म्हणून डायरेक्टर त्यांची बॉलपेन एवढी जाड आणि लांब सिगार पेटवून ओढता ओढता शतपावली करू लागले.

अर्ध्या तासाने सर्व शूटिंगसाठी परत रेडी झाले.
"इंदिरा तुला आमची एक मदत करावी लागेल." डायरेक्टर कोहली इंदिराला म्हणाले, "तु अनुभव सोबत हा सीन कर."
"मी?" इंदिरा शॉक डायरेक्टर रॉक !
"अगं म्हणजे करून दाखव." अनुभव बोलला, "तेवढीच मायराला मदत होईल सीन कसा द्यायचा आहे आणि डायलॉग कसे पास करायचे आहे याबाबत."
"पण माझ्या मायराला मदत नको कोणाची. तेही या सडकछाप मुलीची तर मुळीच नाही." मायराची आई कडाडली. मात्र तिच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. 

इंदिरा सीनसाठी अनुभव सोबत आकाश झुल्यात जाऊन बसली. आकाश झुला सुरु झाला आणि वर जाऊन थांबला. खाली नजर जाताच इंदिराला धडकी भरली. पण अनुभव सोबत आहे हे पाहुन तिनं मनोमन स्वतःला समजावलं, 
" शांत हो, अशा झुल्यात तर तुला कधीचं बसायचं होतं. मग एंजॉय कर या क्षणाला, अनुभवच्या सान्निध्याला. नंतर हे परत येणार नाहीत."
"ऑल द बेस्ट !" म्हणत अनुभवनी तिचे केस मोकळे करण्यासाठी तिच्या केसांचा क्लच काढून बाजूला ठेवला.
"रोल कॅमेरा ऍक्शन !" डायरेक्टर कोहली बोलले आणि वरून पाण्याचा शॉवर सुरु झाला.
आज इंदिरा आणि अनुभव एकमेकांना ते सगळं बोलत होते जे त्यांच्या मनात कितीतरी दिवसांपासून दडलेलं  होतं.

"आज तो चुप मत रहो | कह भी दो कि तुम्हे मुझसे प्यार है |" अनुभव,
"आज आप हमारी सिर्फ आँखेही पढिये और बताईये के हमारे दिलमे क्या है?" इंदिरा,
"अच्छा, फिर तो ना चाहते हुये भी तुम्हे मुझसे प्यार हो जायेगा|"
"हो जाने दिजीये |"
"ये दिल खो जायेगा|"
"खोने दिजीये |"
"हम बदनाम हो जायेंगे |"
"जो आप संग ना जुडे वो नाम नहीं| जो आपके लिये ना लू वो साँस नहीं |"
जोरात वीज कडकते आणि इंदिरा अनुभवला बिलगते. विजांचा आवाज बंद होतो. अनुभव गाणं म्हणतो (म्हणजे लिपसिंग करतोय )

"वो बारिश कि रिमझिम,
वो उनकी गिली जुल्फे,
हमारे चेहरेसे टकराये,
उनकी गर्म साँसे,
हम उलझतेही जाये |"

सीन तसा इथेच कट व्हायला हवा. पण अनुभव आणि इंदिराची केमिस्ट्री पाहुन डायरेक्टर कोहलींनी ठरवलं जेव्हा पर्यंत हे स्वतः झालं म्हणत नाही, शूटिंग होऊच द्यायचा हा सीन.  गाणं संपताच इंदिरा बाजूला होते पण तिच्या केसांची एक लट अनुभवच्या गळ्यातल्या सोन्याचा चैनमधे अडकली.  तिकडे सीन पूर्ण झाला म्हणून आकाश झुला खाली घ्यायला सुरु करतात. झुला हलल्यामुळे केसं काढणं अजूनच कठीण झालं. त्यात तिथलं तापमान 20 अंश सेल्सियस अन इंदिरा नकली पावसाच्या पाण्याने भिजलेली. ती थंडीनी थरथर कापू लागली. इंदिराने थरथरत्या हातांनी केसं काढायचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. तिला वाटलं आता हे केसं तोडावेच लागतील म्हणून ती जोरात केसांना ओढून काढणार तोच अनुभवनी तिचा हात पकडला,
"थांब ! केसं नको तोडु." एव्हाना झुला खाली आला. अनुभवनी त्याच्या गळ्यातली चैन काढून इंदिराच्या गळ्यात टाकून दिली. सगळे डोळे विस्फारून बघतच बसले. हे काय होतंय नक्की. ऍक्टिंग सुरु आहे की ऍक्टिंगच्या बहाण्याने मनातलं ओठांवर आणत आहेत हे दोघं. सर्व ब्लँक !

"हे असं काही तर स्क्रिप्ट मधे लिहीलंच नव्हतं." मायराची आई ओरडून म्हणाली.
"कट कट कट !" डायरेक्टर कोहलींनी ऑर्डर दिला.
"टॉवेल प्लिज." इंदिराला झुल्यातून बाहेर उतरायला मदत करून अनुभवनी तिला टॉवेल दिला.
"जा लवकर चेंज कर." ती गेली.

डायरेक्ट कोहलींनी अनुभवला बोलावून इंदिरा व त्याचा सीन दाखवला.
"बघ म्हटलं होतं ना ही मुलगी आग लावेल."
"हो खरंच, ती इतकं छान ऍक्टिन्ग करू शकेल मलाही वाटलं नव्हतं. तुमचा विश्वास जिंकला."
"यस !"
"पण इंदिरानी कधी शाळेतही ड्रामात वगैरे भाग घेतला असेल याबद्दल शंका आहे मला. तिच्या सारख्या अगदीच सिम्पल साधारण अंग काठी असलेल्या मुलीला लीड रोल ची  हिरोईन म्हणून घेणं योग्य राहणार का? याचा विचार करणं जरुरी आहे. शेवटी पैसा लागला आहे या सिनेमात तुमचा. बाकी ती माझी असिस्टंट आहे. तिच्यासाठी मी फिल्म शोधतच होतो. पण इतक्या लवकर असा डायरेक्ट लीड रोल मिळेल असं वाटलं नव्हतं. अजून बरीच तयारी बाकी आहे तिच्याकडून करून घ्यायची. तिला हिरोईन म्हणून रोल मिळेल तर मला आनंदच होईल. पण तुमचं नुकसान झालेलंही बरोबर नाही."
"मला चांगलं समजतंय तुला काय म्हणायचं आहे. तू बघ हा पिक्चर आता नक्कीच हिट होईल. काजल तिच्या पहिल्या सुपरहिट फिल्म बाजीगरमधे कशी दिसली, जुळलेल्या भुवया आणि सावळा रंग, आता बघ तीच कशी दिसते. रेखा किंवा हेमा मालिनी म्हण किंवा आताची अनुष्का किंवा दीपिका पहिल्यांदा आल्या तेव्हा कशा दिसत होत्या आणि आता किती अपडेटेड दिसतात. तेव्हा दिसण्यावर मुळीच जाऊ नको तिच्या. फक्त तिच्या फिनिशिंगवर काम कर."
"ओके ! पण मायराला आणि तिच्या बाबाला, तुमच्या मित्राला काय सांगणार."
"त्याला सांगतो समजावून. हाडाचा बिजनेसमन आहे तो. लॉस म्हटलं कि हात मागे घेतो. इथे तर पोरीच्या प्रेमापोटी करोडोचा लॉस होईल. त्याला सांगतो तिला चांगल्या ऍक्टिंग स्कुलमधे टाकायला आणि तिच्या आई पासून दूर राहायला. ती बाई मुलीचं नुकसान करतेय. जाऊदे हे. तू इंदिराकडे लक्ष दे. तुझी असिस्टंट नाही हिरोईन आहे आता ती." डायरेक्ट कोहली हसून म्हणाले.

झालं असं होतं की डायरेक्टर कोहली जेव्हा सिगार पीत शतपावली करत होते त्यांची नजर मायरा आणि अनुभवची मिमिक्री करणाऱ्या ओम व मिनूवर पडली. तिथेच उभी असलेली इंदिरा त्यांना डायलॉग कशाप्रकारे पास करायचे ते समजावून सांगत होती. हे करतांना तिने स्वतः मायराचे डायलॉग बोलले. जे अगदी तसेच होते जसे डायरेक्टर कोहलीला हवे होते. तेव्हाच त्यांनी ठरवलं की, 'प्यार एक एहसास ' सिनेमात मेन लीड असलेल्या प्रेयसीची भूमिका इंदिराच साकार करणार. अनुभवला हे ऐकून आश्चर्य वाटलं. पण तोही इंदिरासाठी फिल्म शोधतच होता त्यात डायरेक्टर कोहली ऐकायलाच तयार नाही म्हणून त्यांनी इंदिराला काहीच न सांगता ट्रायल घ्यायचं ठरवलं. म्हणजे इंदिराला जमलं तर सीनही फायनल आणि हिरोईनही. नाही जमलं तर कोणाला काही माहितच नाही. 

क्रमश :

धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

​​​​​​